Home शैक्षणिक नूतन ज्ञानमंदिर च्या अंगणी माती महोत्सव साजरा

नूतन ज्ञानमंदिर च्या अंगणी माती महोत्सव साजरा

Spread the love

नूतन ज्ञानमंदिर च्या अंगणी माती महोत्सव साजरा

 


( दिशा महाराष्ट्राची / ठाणे )


 

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण चे नूतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कल्याण पूर्व शाळेत गुरूवार, दिनांक ५/१/२०२३ रोजी माती दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळाच्या माध्यमातून ‘माती महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची दोन सत्रे आयोजित करण्यात आली होती. पहिल्या सत्रात शाळेच्या इयत्ता ७ वी च्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमास रोटरी क्लब यंग डोंबिवली येथील चार्टड प्रेसिडेंट डॉ. मंगल तिवारी, रोटरी क्लब यंग डोंबिवलीचे आताचे प्रेसिडेंट श्री. अजय सुर्यवंशी, श्री. राजेश जंगम, प्रिमियम प्रेसिडेंट, स्वच्छ डोंबिवली अभियानाचे श्री. अनिल मोकळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सिरॅमिक ॲन्ड पोर्टरी आर्ट्स चे प्रशिक्षण घेतलेली कु. आदिती दिक्षित हिने मातीपासून सुबक व नाविन्यपूर्ण कलाकृती, भांडी तयार करण्याची कार्यशाळा घेतली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गागरे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. निकूम सर व पर्यवेक्षक श्री. भामरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरण दक्षता मंडळाच्या सौ. रूपाली शाईवाले, कु. आदित्य कदम याचे सहकार्य लाभले तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती सुलभा परदेशी, सौ. वैशाली वाबळे, सौ. रेणुका जोईल यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.

Related Posts

Leave a Comment