दापोलीत धम्म संहिता, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा, जनसमर्थ अभियान कार्यक्रम संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / दापोली)
दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी ठीक ११ वाजता पेंशनर हॉल दापोली येथे, धम्म संहिता बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा, जनसमर्थ अभियान कार्यक्रम दादासाहेब मर्चंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या धम्म संहिता अँक्शन कमिटी चे मुख्य समन्वयक प्रा. ॲड. दिलीप काकडे यांनी बुद्ध विहार कायदा का आवश्यक आहे आणि त्याची गरज का आहे या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना अनेक बाबी वर प्रकाश टाकत सदर कायदा का गरजेचा आहे हे दापोली तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा,पंचायत समिती दापोली आणि बौद्ध जैन सेवा संघ दापोली या तालुक्यातील या संघटनांचे पदाधिकारी सभासद यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास समन्वयक मुकुंद रोटे आणि शरद रामचंद्र जाधव (बौद्ध जन सेवा संघ मध्यवर्ती कमिटी अध्यक्ष दापोली), सुरेश महाडिक (अध्यक्ष शिरखल केंद्र), विजय पवार (दापोली अ केंद्र अध्यक्ष) सूनील जाधव (देगाव केंद्र सेक्रेटरी), अशोक जाधव (दापोली ब केंद्र उपाध्यक्ष), भारतीय बौद्ध महासभेचे संजय तांबे, कोषाध्यक्ष रुपेश मर्चंडे, त्याच प्रमाणे पंचायत समितीचे चिटणीस श्रीधर जाधव, किरण जी गमरे , प्रबुद्ध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव, मा. खैरे आणि महिला आघाडीच्या प्रमुख रेश्मा ताई नेवरेकर आणि सभासद, त्याच प्रमाणे मध्यवर्ती कमिटी चे चिटणीस सुरेश मोरे, हनुमान मोरे, रविंद्र मोहिते, राहुल जाधव आणि दिनेश जी रूके उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक चरणदास मर्चंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रितम रूके यांनी केले. सर्वांनी सदर कार्यक्रमास पाठिंबा देऊन हा कायदा होणे करिता पुढाकार घेण्याचे अभिवचन दिले व हा विषय समाजापर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे ठरवण्यात आले. शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि काकडे साहेब यांचे आभार शरद जाधव यांनी मानले.