भीमशक्ती- शिवशक्ती युतीचा प्रयत्न यशस्वी- शिंदे गट व वंचित बहुजन आघाडी विजयी
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई- अनंतराज गायकवाड)
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात कोनड खुर्द या गावी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चे चार व वंचित बहुजन आघाडीचे चार असे एकूण आठ सदस्य विजयी झाले आहेत.
दि. ८ जानेवारी रोजी ‘धम्म ध्वज दीन’ चे औचीत्य साधून रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार नवी मुंबई ऐरोली विधानसभा प्रमुख मा. प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा सायं. ५ वाजता जेतवन बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते बुद्ध वंदना घेऊन महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. तसेच मा. प्रकाश वानखेडे यांच्या शुभहस्ते चंदाताई अजाबराव जावळे (सरपंच) संजय दौलत वानखेडे (उपसरपंच) जया प्रताप वानखेडे, शोभा अंकुश पैठणे, कुसुम बाजीराव वानखेडे, शंकर संजय जावळे, अनुराधा प्रवीण जावळे, नंदा सुखदेव जावळे या विजयी उमेदवारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
तसेच या प्रसंगी समता सैनिक दलाचे डी. ओ. एकनाथ बोर्डे गुरुजी, समता सैनिक विलास जाधव, शाहीर अरुण साळवे, पत्रकार ए. के. गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच व सदस्यांसह सर्व ग्रामस्थ महिला, बालके, तरुण व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.