Home राजकीय शिक्षकांशी एकनिष्ठ राहीलो याचाच अभिमान- आ. बाळाराम पाटील

शिक्षकांशी एकनिष्ठ राहीलो याचाच अभिमान- आ. बाळाराम पाटील

Spread the love

शिक्षकांशी एकनिष्ठ राहीलो याचाच अभिमान- आ. बाळाराम पाटील

 


(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

कोकणातील सहा जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्याला निवडून दिले आहे आणि त्याची उत्तराई करण्याचा प्रयत्न आपल्या आमदारकीच्या काळात करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आमदारकीच्या काळात माझ्या आचरणातुन कोणत्याही शिक्षकाला शिक्षण संस्थेला आणि कर्मचाऱ्यांना खाली मान घालावी लागली नाही याचा अभिमान असल्याचे शिक्षक आ. बाळाराम पाटील यांनी जाहीर केले.

दरम्यान शिक्षकांची जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होणार नाही तोवर आपण आमदारकीची पेन्शन स्वीकारणार नाही आशी घोषणा बाळाराम पाटील यांनी केली. कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लढविणाऱ्या टीडीए पुरस्कुत पुरोगामी शिक्षक संघटना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आ. बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी शिक्षक संवाद सभेचे आयोजन केले.

यावेळी राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, नितीन सावंत, शेकापचे जेष्ठ विलास थोरवे, भगवान चंचे, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, उत्तम कोळंबे, शिवाजी खारीक, शरद लाड, शेकाप खालापुर तालुका माजी चिटणीस संतोष जंगम, पनवेल तालुका चिटणीस पाटील, नगरसेवक गणेश कडू, संपत हडव, महेश म्हसे, दत्ताञय पिंपरकर, तानाजी मते आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment