अनंत गीते यांचे भरत गोगावले यांना आव्हान
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
गद्दार तिनही आमदारांना निवडणूकीत पाणी पाजा अशी घणाघाती टिका करीत ज्या महाड तालुक्यात रायगड किल्ला येतो तिथल्या आत्ताच्या आमदारामध्ये मर्दुमकी असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडणूक लढवुन दाखवावी. डिपाँझिट घालवले नाही तर राजकारण सोडून देईन असे आव्हान माजी केद्रिय मंत्री आनंत गीते यांनी भरत गोगावले यांना दिले.
गोरेगाव येथे आयोजित शिवसेनेच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, रायगड चे संपर्क प्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे, उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, जिल्हा सघटक बाळा राऊळ, अमित मोरे, युवा सेना जिल्हा अधिकारी बंटी पोटफोडे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, विभाग प्रमुख सिकंदर अंबोणकर, शिवाजी गावडे, राजा बिरवाडकर, महीला संघटक ज्योती मनवे, शिवानी महामुणकर, स्वाती दबडे, शाखाप्रमुख मंगेश बामणोलकर, युवासेनेचे अक्षय कदम, रुपेश रातवडकर, मोनिष ढेबे उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी गद्दाराचा खास शैलीत समाचार घेतला. गीते यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत अभूतपूर्ण यश मिळविले आता येणाऱ्या जिल्हापरिषेद व पंचायत समिती निवडणुकी मध्ये यांना थारा राहाणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन करीत शिवसैनिकांना वज्रमुठ करुन विश्वासघातकीचा पराभव करण्याची प्रतिज्ञा दिली.