पनवेल तालुका पञकार संघर्ष समितीच्या आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
पञकार दिनाचे औचित्य साधुन पनवेल तालुका पञकार संघर्ष समिती व रा. स्व. संघ जनकल्याण समिती डाँक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला पनवेल नवी मुंबई मधील सर्व पञकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
आद्य पञकार बाळशारञी जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीत पहीले नियतकालिका सुरु केले. त्याचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात पञकार दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पनवेल येथील डाँ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात हे शिबीर पार पडले.
या शिबीराचे उदघाटन सल्लागार जेष्ठ पञकार सुनिल पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ईसीजी कक्षाचे उदघाटन जेष्ठ पञकार विजय कडू, बीएमडी कक्षाचे उदघाटन जेष्ठ पञकार गणेश कोळी व जेष्ठ पञकार दिपक महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये सीबीसी ईसीजी इएनटी बीपी एचबीए १सी या चाचण्या मोफत करण्यात आल्या.