पनवेल पालिकेच्या नवीन इमारती मध्ये पत्रकारांसाठी विशेष कक्ष स्थापन करणार
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
पालिकेच्या नवीन इमारती मध्ये पत्रकारांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असुन विविध सुविधा देण्यात येणार आहेत. या कक्षाची नियमावली तयार करण्यासाठी साहाय्य करावे असे प्रतिपादन आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार दिनानिमित्त पनवेल महापालिकेत आयोजित कार्यक्रमांदरम्यान केले.
पनवेल महापालिकेच्या मुख्यालयातील कक्षामध्ये मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्री जाभेकर प्रतिमेस आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके उपायुक्त कैलास गावडे, जनसंपर्क आधिकारी वर्षा कुलकर्णी, जनसंपर्क प्रशासक दैनिकात आलेल्या बातम्या सकारात्मक घेऊन त्या समस्या सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करते पुढील वर्षी पञकार दिन साजरा करण्यासाठी पञकारांनीच पुढाकार घेऊन नवनवीन कल्पना, सुचना काही महीने आधी द्याव्यातृ असे आवाहनही यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.