पाटणसई बौध्दवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
रोहे तालुक्यातील पाटणसई येथील बौध्दवाडी ते आदिवासीवाडी पर्यतच्या रस्त्याच्या डांबरीकरण भुमिपुजन नुकतेच करण्यात आले.
शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी आमदार रवी पाटील यांच्या माध्यमातून विधानसभा मतदार संघात चांगले रस्ते होत असुन पाटणसई बौध्दवाडी ते आदिवासी वाडी पर्यतचा रस्ता त्यांच्याच आमदार फंडातुन करण्यात येत असल्याचे सांगितले.
रस्ता भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा रोहे तालुका सरचिटणीस आनंद लाड प्रशांत पाटील युवासेना (बाळासाहेब शिवसेना) रोहे तालुका सचिव मंदार कोतवाल, राकेश मिनमीने, चंद्रकांत राणे, प्रल्हाद राणे, प्रल्हाद दाभाडे, निलेश कोतवाल, सागर राऊत, विजय गायकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.