रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त पदी पदोन्नती
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
रायगडचे जिल्हाधिकारी डाँ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदी २०२१मध्ये नियुक्त झालेल्या डाँ. महेंद्र कल्याणकर यांच्या कडे मागील काही महीन्यापासुन कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नती च्या प्रतिक्षेत असलेल्या डाँ. महेंद्र कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे.
कल्याणकर यांनी आपतकालीन परिस्थितीत खबीरपणे उभे राहुन रायगडचे पालकत्व स्वीकारले होते. जनसामान्याचे प्रश्न त्यांनी तात्काळ सोडविले होते. तर कोरोना कलावधीत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता.
२००च्या बँचचे आयएएस आधिकारी असणारे डाँ. महेंद्र कल्याणकर कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून योग्य भुमिका बजावली आहे.