Home शैक्षणिक नूतन ज्ञानमंदिर शाळेत मराठी भाषेचा जागर

नूतन ज्ञानमंदिर शाळेत मराठी भाषेचा जागर

Spread the love

नूतन ज्ञानमंदिर शाळेत मराठी भाषेचा जागर

 


( दिशा महाराष्ट्राची / कल्याण )


 

एकीकडे इंग्रजी माध्यमांकडे कल वाढत असल्याचे बोलले जाते. मात्र असे असले तरी कोरोना काळानंतर मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी प्रमाण वाढले आहे. मराठी हि तोंडी लावण्यासाठी नाही तर ज्ञान भाषा आहे असे प्रतिपादन अभिनेत्री तथा मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित यांनी केले. कल्याण पूर्वेतील छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन ज्ञानमंदिर शाळेत पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. तसेच ‘मराठी शाळांकडे वळा’ असा संदेश देखील त्यांनी बोलताना दिला.

कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रांगणात वार्षिक सेन्हसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी अभिनेत्री व मराठी शाळा सदिच्छा दूत चिन्मयी सुमित, विज्ञान व तंत्रज्ञान शाखाप्रमुख दूर व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठाचे प्रा. मंदार भानुसे, छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी एकनाथ गागरे, शालेय समिती सदस्य फडके, उपमुख्याध्यापक बबन निकम, पर्यवेक्षक विजय भामरे यांसह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मराठी शाळांमध्ये आपल्या संस्कृतीचे जपणूक होण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून उपक्रम राबवले जात आहे. मराठी हि तोंडी लावायची भाषा नव्हे हि तर ज्ञान भाषा आहे. कोव्हीड काळानंतर पालक वर्ग मराठी शालानाकडे वळले आहेत. पालकांना नक्कीच कळेल कि मराठी शाळांचे सुरु असलेले ज्ञान देण्याचे काम हे उत्तम आणि दर्जेदार आहे. शिक्षक आणि पालक एकत्र येवून विद्यार्थ्यांचे हित साधत आहे. हे चित्र फक्त मराठी शाळांमध्येच दिसेल. त्यामुळेच मराठी शाळांकडे वळा असा संदेश कार्यक्रमच्या निमित्ताने दिला.

चिन्मयी सुमित ह्या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलतात कि, मी मराठी शाळेत शिकले. माझे आई वडीलांचे शिक्षण मराठीतूनच झाले. माझी माझ्या मुलांचे शिक्षण मराठीतूनच झाले आहे. मराठी शाळांच्या अनुभव गाठीशी असल्याने मी सदिछादूत झाले. मराठी शाळेतील शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा त्यातून आई वडिलांची आपुलकी जाणवते. मराठी माधाय्मातून शिक्षण हे तणावमुक्त शिक्षण आहे. मराठी भाषा हि संस्कृती, स्वभाव घेऊन उभी राहते. मराठी शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडल तेव्हा तुमचे भवितव्य उज्वल असेल. इंग्रजी हि विश्वाची खिडकी आहे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्व पटवून देण्यासाठी ‘वाघिणीचे दुध तेव्हाच पिता येईल, जेव्हा आईचे दुध प्याले असाल.’ असे उदाहरण देत जेव्हा मातृभाषा येत असेल तरच इतर भाषा देखील कठीण जाणार नाही.

शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात काळानुसार अनेक बदल होताना दिसतात हे बदलाचे वारे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी घेऊन येतात. तरी शाळांमधील पारंपारिक स्नेहसंमेलनाचा गोडवा टिकून ठेवण्याचा प्रयत्न या वार्षिक स्नेहसंमेलनात गेली अनेक वर्ष करत आहेत. बाल नाट्य, पथनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा, नवीन व जुन्या गाण्यांचा सुंदर मिलापसाधून त्याची फ्युजन नृत्य प्रकार हे शिक्षक व विद्यार्थी मिळून बसवितात. यामध्ये शिक्षक सांस्कृतिक प्रमुख ममता वसावे व अस्मिता सावंत यांच्या कल्पनेतून साकारण्यात आला. शळेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक विविध स्पर्धेत देखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत पारंगत झालेल्या पालकांना बक्षीस देण्यात आले.

Related Posts

Leave a Comment