Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

 


( दिशा महाराष्ट्राची )


बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री परळीत ही घटना घडली असल्याचे समजते. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरीही त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. रात्री उशिरा अपघात झाला मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Related Posts

Leave a Comment