Home ताज्या बातम्या राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचा संप पहिल्याच दिवशी मागे

राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचा संप पहिल्याच दिवशी मागे

Spread the love

राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांचा संप पहिल्याच दिवशी मागे

 


( दिशा महाराष्ट्राची / मुंबई )


 

राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्य रात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता.

पण संपाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत महावितरण कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. देवेंद्र फडणवीस आणि महावितरण अधिकाऱ्यांची बैठक यशस्वी ठरल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली.

“आमची वीज वितरण कंपन्यांच्या 32 संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला कंपन्यांचं कुठलीही खासगीकरण करायचं नाही. याउलट राज्य सरकार पुढच्या तीन वर्षांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. यापूर्वी उडीसाने हे केलेलं आहे. पण महाराष्ट्रात तसा विषय नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Related Posts

Leave a Comment