संपकाळातही अखंडीत वीजपुरवठ्याची तयारी
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
वीज कामगार संघटनांनी मध्यरात्री पासुन तीन दिवसाच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणाने सपुर्ण तयारी केली आहे.
वीजपुरवठ्याच्या परिस्थिती वर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरु करण्यात आली असुन हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहाणार आहे. कंपनीने ठरवुन दिलेली कामे न करणाऱ्या आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
रजेवर असलेले आधिकारी व कर्मचांर्याना त्वरीत कामावर रुजु होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संपकाळात वीजपुरवठा अखंडीत व नियमीत ठेवण्याकरीता महावीतरणाने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कञाटी कामगार, सेवानिवृत झालेले अंभियता व कर्मचारी यांच्या सोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्याना या संपकाळात विविध उपकेद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात कामे करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असुन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे अशा ठिकाणी आजच साहित्याची व्यवस्था करण्याची निर्देश ही सर्व क्षेत्रीय आधिकार्यांना देण्यात आले आहेत.