स्त्री शिक्षणाची जननी आपली सावित्रीमाई- तुषार नेवरेकर
( दिशा महाराष्ट्राची )
अखंड स्त्री जीवनाला विद्याविश्वात कायम जिवंत ठेवण्याचे काम ज्या मातेने केले आणि सामान्य नागरिकापासून उच्च विद्याविभूषित पायरीवर हक्काने विराजमान होण्याचा मान ज्या ममतेने दिला, त्या प्रेमळ वात्सल्याची खाण माता सावित्रीबाई फुले ह्यांचा आज जन्मदिन. समस्त पुरुषवर्गासोबत स्त्री जातीला ह्या गोष्टीचा अभिमान स्वाभिमान वाटायलाच हवा.
विद्यादानाच्या क्रांतिकारी चळवळीमध्ये जे काम सावित्रीमाईने केले, जो लढा ज्योतिबांच्या सोबत अखंडपणे उभारला ते सर्वांना ठाऊक असावे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्या इतिहासात आज मी जाऊ पाहत नाही. मला हे बोलायचे आहे की, ज्या सावित्रीमाईने ज्यांच्यासाठी हा लढा उभारला, ज्यांच्यासाठी अंगावर शेण, दगड झेलले त्या किती लेकींना ह्याची आजतागायत जाण आहे? असेलही काहींना ह्यात काडीमात्र शंका नाही. पण जिच्यामुळे आज ज्यांना घरात, समाजात, मानव प्राण्यात सन्मान मिळत आहे, हक्काचे व्यासपीठ मिळत आहे, घराबाहेर फिरता येते, मस्ती मौज मजा करता येते त्या माईचे गुणगान गायचे सोडून द्या पण आज तीची आठवण ही नसेल.
नविन कपडे घालायला, मित्र मैत्रीणींसोबत फिरायला, सिनेमा पहायला, शो शायनिंग करायला तासनतास वेळ मिळत असतो. पण तिची आठवण, तिला अभिवादन, वंदन करायला वेळ मिळत नाही. आज काहींचा व्हॉटस्अप डीपी असेलही माईचा, पण तिचे विचार आपण किती अमलात आणतो हेही लक्षात घेतले पाहिजे.
अरे तिने अंगावर फाटक्या चोळ्या नेसून, अंगावर शेण दगडाचा वर्षाव झेलून आज साऱ्या लेकींना शिक्षणाचे द्वार खुलेच नाही तर हक्काचे करून दिले आहे. त्याच सावित्रीच्या लेकिंच्या अंगावरही कमी कपडे असतात पण शो करायला. सुंदर दिसायला. मग सांगा वाकडी नजर का जाऊ नये? हे शिक्षण दिलेले आहे का मातेने?ज्या संस्काराचे शिक्षण दिले गेले आहे ते संस्कार आज गंगेला मिळाले आहे. शिक्षण घ्या, त्याचे पालन करा आणि उच्च विद्याविभूषित होऊन आई बाप, समाज, देशाचे नाव रोशन करा तरच त्या सावित्री मातेच्या त्रासाला, मेहनतीला फळ येईल आणि ते फळ तुम्हीच चाखणार आहात ना?
चला मग आज पासून एक चांगला निर्धार करू आणि नेक काम करण्यास सुरुवात करू. शिका आणि शिकवा. संस्काराचे धडे, आचारणाचे पोवाडे, कारण तिने खुले केले आहे विद्येची कवाडे. आज अभिवादन करुन झाल्या गेल्या भूतकाळावर विरझन घालून नव्या उमेदिने जगायला शिका. तरच समाजात मान सन्मान मिळेल नाहीतर… सावित्रीच्या माईच्या पुण्यकर्मावर प्रश्नचिन्ह उभे राहील. तिलाच लाज वाटेल की ज्या भविष्यासाठी मी त्रास सहन केला, घराबाहेर राहिले, मिळेल ते खाल्ले त्याचा काडीमात्र उपयोग नाही. अशी वेळ येऊ देऊ नका माता भगिणींनो, कारण ह्याशिवाय मोठा अवमान आणि अपमान कोणताच नसेल हे लक्षात घ्या.
आज ३ जानेवारी,
ज्यांनी स्त्रियांचे चुल आणि मुल मोडीत काढले, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिले. आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्णपणे बदलली. भारतातील प्रथम शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस तथा जंयती निमित्त विनम्र अभिवादन !!!
– अभिवादक –
आयु. तुषार गौतम नेवरेकर
दाभीळ, दापोली (रत्ना.)
७२१८४६७९६३