निवे बुद्रुक बौद्धवाडी ग्रामस्थांची स्थानिक पातळीवरील अडचणी संदर्भात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंची भेट
( दिशा महाराष्ट्राची / दिपेश मोहिते- ठाणे )
निवे बुद्रुक, तालुका- संगमेश्वर, जिल्हा- रत्नागिरी येथील अनेक प्रलंबित कामांच्या निवेदनासाठी, निवे बुद्रुक ग्रामस्थ तसेच मुंबई कमिटीचे सर्व पदाधिकारी दिनांक – ३०/१२/२०२२ रोजी माननीय केंद्रीय समाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेऊन, गाव पातळीवरील स्थानिक रस्त्याची नवीन बांधणी तसेच डांबरीकरण करणे व नवीन ब्रिज बांधून पावसाळ्यात ग्रामस्थांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विनवणी करण्यात आली. रामदासजी आठवले साहेबांनी सर्वांच्या अडचणी ऐकून घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून या जीवनावश्यक अडचणींना दूर करण्याचे आश्वासन दिले.
अनेक वर्षांपासून निवे बुद्रुकचे ग्रामस्थ या अडचणींना तोंड देत आहेत. अनेकदा समाज कल्याण अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध नाही किंवा संपला आशा प्रतिसादमुळे ग्रामस्थ त्रस्त होते, यामुळे आठवले साहेबांशी झालेल्या भेटीने आणि मिळालेल्या आश्वासनाने सर्व निवे बुर्द्रुक ग्रामस्थांना आशेचा किरण लाभलेला जाणवत आहे.
याप्रसंगी निवे बुद्रुकचे उप- सरपंच अमोलजी जाधव, बौद्धजन विकास मंडळ निवे बुद्रुक मुंबई अध्यक्ष अशोक जाधव, सचिव राजु का जाधव, उपसचिव दीपक जाधव , खजिनदार विजय कदम आणि सदस्य महेश जाधव हे उपस्थित होते.