विजया शिंदे “राष्ट्र चेतना पुरस्कार २०२२” ने सन्मानित
(दिशा महाराष्ट्राची / कल्याण )
कल्याणच्या विजया शिंदे यांना साहित्य क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्याच्या गौरवशाली अमृत महोत्सव व पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त राष्ट्र चेतना पुरस्कार २०२२ देण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातून अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी महापौर, डाॅ सारिका पाटील, स्नेहल भोपळे अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना महावस्त्र, स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विजया शिंदे या साहित्य क्षेत्रात सदोदित काव्य संमेलन ऑन लाईन, ऑफ लाईन कार्यरत असतात. अनेक स्पर्धेसाठी चारोळी, कविता, ललित लेख, हायकू, अलख यांवर लिखाण करतात. त्यांना सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट अशी सन्मान पत्र मिळालेली आहेत. त्यांना साहित्य सेवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. जनगौरव कार्यदर्पण आयकॉन पुरस्कार २०२२, ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई आयोजीत राष्ट्रस्तरीय महात्मा फुले समाजभुषण पुरस्कार २०२२ मिळाला आहे.
मंत्रालयातून अधिकारी म्हणून रिटायर्ड असून त्यानी साहित्याचा छंद जोपासला आहे. समाजकार्यात देखील सतत हिरिरीने भाग घेत असतात. विजया शिंदे यांचेवर साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असल्याने त्यांच्या वर साहित्य क्षेत्रातून तसेच कल्याणकर साहित्य प्रेमीकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.