उमरखेड तालुक्यातील बंदीभागात अनेक विकास कामांसाठी आमदार नामदेव ससाणे यांचे आश्वासन
(दिशा महाराष्ट्राची / उमरखेड- लखन जाधव)
उमरखेड तालुक्यातील बंदीभागात येणाऱ्या अनेक समस्या आहेत. आमदार स्थानिक निधी अंतर्गत जेवली, मोरचंडी, पिंपळगाव, बिटरगाव, आकोली, चिंचोली या गावातील अनेक कामांचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे.
यावेळी आमदार नामदेव ससाणे यांनी या भागातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांसाठी विमा मागणी शासनाकडे करू तसेच आपल्या कोणत्या समस्या असेल तर त्याला सोडवण्यासाठी काम करू, या भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार समस्या सोडवण्यासाठी काम करू असे आश्वासन दिले. आज बंदीभागाच्या विविध विकास काम सुरू झाले यानंतर सुद्धा विकास काम होईल असे आमदार नामदेव ससाणे यांनी सांगितले आहे.