कुंभे धरणावरील लोखंडी राँड चोरणारे अटकेत
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
कुंभे ता. माणगाव येथे सुरु असलेल्या धरण कामावरील लोखंडी राँडसह अन्य साहित्य चोरणाऱ्या चोरांना पकडण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी हे धारियत कन्ट्रक्शन मध्ये काम करीत असुन त्यांच्या कंपनी मार्फत कुंभे धरणावर काम सुरु आहे. या बांधकामावरील ९० हजार रूपयाचे १२०० किलो वजनाचे टिएमटी स्टिल ३२ एमएम व २५ एमएम चे लोखंडी राँड निळ्या रंगाच्या टेम्पोत टाकुण कोणीतरी अनोळखी चोरट्यांनी चोरुन नेले होते. याबाबतची तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक राजेद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आधिकारी किर्तीकुमार गायकवाड, शाम शिदे, रामनाथ डोईफोडे, मयुर पाटील यांनी गुन्ह्यातील निळ्या रंगाचा टेम्पोचा व चोरट्याचा शोध घेऊन आरोपी कार्तिक अशोक वाघमारे रा.सुकेळी, चेतन अशोक वाघमारे रा. सुकेळी, मारुक रशीद खान रा. पुगाव यांना पकडले.
यामध्ये टाटा टेम्पो व त्या मध्ये असलेले ९० हजार रुपयाचे १२८० किलो वजनाचे स्टील ३२ एमएम २५ एमएम चे लोखंडी राँड २००० रुपये किमतीचा एक लोखंड कापायचे गँस कटर १०००० रुपये किमंतीचे दोन भरलेले आँक्सिजन सिलेडर ६००० रुपये किमंतीचा एक निळ्या रंगाचा एचपी कंपनीचा १९किलोचा एलपिजी गँस सिलेडर असे एकुण ८ लाखचा ८००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीना अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पोलिस आधिक तपास करत आहेत.