कल्याणच्या साहित्यिका विजया शिंदे राष्ट्रस्तरीय महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार २०२२ ने सन्मानित
( दिशा महाराष्ट्राची / कल्याण )
कल्याणच्या सुप्रसिद्ध साहित्यिका विजया शिंदे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकाॅर्ड नवी मुंबई आयोजित राष्ट्रस्तरीय महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार २०२२ देण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातून टॅलेंट पात्रता यांची निवड केली होती. या प्रसंगी उपस्थित पाहुणे जयंत ओक (एक पात्री टी. व्ही. कलाकार), श्रीमती सतार मॅडम (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या), दिप्ती भागवत (मालिका टी. व्ही. कलाकार), डाॅक्टर अमजद खान पठाण (कर्क रोग तज्ज्ञ) उपस्थित होते. यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पदक, स्मृतीचिन्ह , सन्मान पत्र व ज्ञानगंगा पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
विजया शिंदे या साहित्य क्षेत्रात सदोदित काव्य संमेलन ऑन लाईन, ऑफ लाईन कार्यरत असतात. अनेक स्पर्धेसाठी चारोळी, कविता, ललित लेख, हायकू, अलख यांवर लिखाण करतात. त्यांना सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट अशी सन्मान पत्र मिळालेली आहेत. तसेच साहित्य सेवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. जनगौरव कार्य दर्पण आयकॉन पुरस्कार २०२२ मिळाला आहे. लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्याच्या गौरवशाली अमृत महोत्सव व पुज्य साने गुरुजी जयंती निमित्त राष्ट्र चेतना पुरस्कार २०२२ मिळाला आहे. मंत्रालयातून अधिकारी म्हणून रिटायर्ड असून त्यानी साहित्याचा छंद जोपासला आहे. समाजकार्यात देखील सतत हिरिरीने भाग घेत असतात. मराठा सेवा प्रतिष्ठान या संघटनेवर त्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत. परदेशी दौरे केलेले आहेत .सामाजिक संस्था, आश्रमशाळा येथे जाऊन भेटतात. वाचन, लिखाण, याची आवड आहे. सर्वच क्षेत्रांत आवडीने भाग घेत असतात.
कल्याणकर असलेल्या विजया शिंदे यांचेवर साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असल्याने त्यांच्या वर साहित्य क्षेत्रातून तसेच कल्याणकर तसेच सर्व स्तरातील साहित्य प्रेमीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.