२२ प्रतिज्ञा अभियान मुख्य कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण
( दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई )
२५ डिसेंबर म्हणजे सर्व बहुजनांसाठी एक क्रांती दिवस ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृती चे जाहीर दहन केले. तसेच पुणे देहूरोड येथे १९५४ ला बुद्धमूर्ती स्थापन केली. याच क्रांती दिनी २२ प्रतिज्ञा अभियान महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रचारक प्रदिप जाधव आणि मुख्य प्रचारीका नीता सोनटक्के मॅडम यांच्या हस्ते आज २२ प्रतिज्ञा अभियान या अभियानाच्या मुख्य कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले.
विशेष म्हणजे या कार्यालयात आपणास विविध विषयांवरील माहिती मिळणारी अशी भव्य लायब्ररी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, सायन्स स्टुडिओ, यू ट्यूब स्टुडिओ उपलब्ध असेल. तसेच गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या कालावधीकरीता रूम उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा करायचा असेल त्यांच्या करिता स्टडी सेंटर एक हॉल असेल.
बुध्द धम्म प्रचार आणि प्रसारा करीता आपण हे २२ प्रतिज्ञा अभियान कार्यालय सुरू केले असून आपल्या बांधवांनी योग्य तसा वापर करावा हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अधिक माहिती करिता २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारकांशी आपण संपर्क करू शकता असे २२ प्रतिज्ञा अभियान महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रचारक प्रदिप जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.