Home मनोरंजनदेश विदेश UHRC पुन्हा एकदा धावली मदतीला 

UHRC पुन्हा एकदा धावली मदतीला 

Spread the love

UHRC पुन्हा एकदा धावली मदतीला 

 


( दिशा महाराष्ट्राची / ठाणे )


 

दिनांक 22 डिसेंबर २०२२ रोजी अनिता लोंढे नावाच्या अंगणवाडी शिक्षकेकडून UHRC च्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांना फोन आला की त्यांना एक सतरा वर्षाची मुलगी मिळाली असून ती बिहार वरून पळून आलेले आहे.

त्यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा कदम यांनी सदर घटनेची पूर्ण माहिती घेऊन दिवा पोलीस स्टेशनजवळ संपर्क साधला आणि सदर मुलीला दिवा पोलीस स्टेशन येथे हजर केले असता तिच्याकडून माहिती मिळाली की ती मुलगी अल्पवयीन आहे, तिच्या घरी तिच्या लग्नाविषयी जबरदस्ती केली जात आहे म्हणून ती घरातून पळून आलेले आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीने तिला इथपर्यंत आणले त्या काशी पंडित नावाच्या व्यक्तीने त्याला ही सदर मुलगी ट्रेनमध्ये भेटली असता घाबरलेल्या अवस्थेत होती असे सांगितले. त्यामुळे त्यांनी विश्वासात घेऊन सर्व माहिती विचारले आणि त्या मुलीला दिवा येथे घेऊन आला आल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि तिचे पती शहाजी लोंढे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सदर मुलीला ताब्यात घेतले तिला सर्व माहिती विचारले. महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांना संपर्क साधून सदर मुलीला त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या कार्यात दिवा पोलीस स्टेशनचे पी. एस. आय. कींगरे साहेब, पोलीस हवालदार राजेंद्र देसले, जयवंत कोळी आणि आव्हाड मॅडम आणि त्यांच्या टीमचे खूप छान सहकार्य लाभले त्याबद्दल दिवा पोलीस स्टेशनचे सुवर्णा कदम यांनी आभार व्यक्त केले.

Related Posts

Leave a Comment