अलिबाग सिव्हील अतिदक्षता विभागच व्हँटीलेटरवर
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग दुरुस्तीच्या नावाखाली गेले दोन तीन महीने बंद आहे. त्यामुळे तात्पुरता अतिदक्षता विभाग हे त्याच इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या महीला वार्डात स्थालातरित केला आहे.
या महीला वार्डात एका बाजुला सिरीअस पेशन्टला व्हँटीलेटरच्या बेड लावुन पेशटवर उपचार करतात. तर दुसऱ्या बाजुला महीला रुग्णासाठी उपचाराची व्यवस्था केली आहे. या दुसऱ्या बाजुला फक्त १२ बेडच्या जागेत चक्क १९ बेड बसविलेत. त्यामुळे तेथे रुग्ण व त्यांची काळजी घेणारे नातेवाईक यासाठी हे एकदम दाटीवाटीत राहाव लागत आहे. आय.सी.यु.पेशंटची नाजुक अवस्था असते. रुग्णावर उपचार चालु असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा ञास होणे अपेक्षित नसते, मात्र सध्या तसा प्रकार होताना दिसत नाही. दोन्ही प्रकारच्या पेशंटना नाहक ञास सहन करावा लागतोय.
आय.सी.यु. विभागातील दुरुस्तीचे काम कित्येक दिवसापासुन बंदच आहे. याबाबतीची तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत. लवकरात लवकर काम पुर्ण करुन आय.सी.यु. पेशंट व महीला वार्डातील रुग्ण यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.