मुंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी घेतला सहलीचा आनंद
( दिशा महाराष्ट्राची / मंडणगड )
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने नुकतेच शिर्डी- औरंगाबाद- वेरुळ- अहमदनगर- पुणे या मार्गावर अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सहलीमध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रा. ज्ञानदेव गिते, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. पुरुषोत्तम पिलगुलवार, प्रा. प्रमोद वासकर, प्रा. प्राची कदम हे सहभागी झाले होते. महाविद्यालयात विद्यार्थ्याना चार भिंतीच्या बाहेरचे जग, निसर्ग प्रत्यक्ष अनुभवता यावा या उद्देशाने सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये एकूण 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहलीमध्ये ऐतिहासिक, धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे व वास्तू विद्यार्थ्यानी पाहिले व त्याचा आनंद घेतला.
सहलीकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांचे कुशल मार्गदर्शन लाभले होते. प्रा. ज्ञानदेव गिते, प्रा. अशोक कंठाळे व सर्व सहकारी प्राध्यापकांनी सहल यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.