Home साहित्य डोंबिवलीतील सुप्रसिद्ध कवी अविनाश ठाकूर “भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२” ने सन्मानित

डोंबिवलीतील सुप्रसिद्ध कवी अविनाश ठाकूर “भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२” ने सन्मानित

Spread the love

डोंबिवलीतील सुप्रसिद्ध कवी अविनाश ठाकूर “भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२” ने सन्मानित

 


( दिशा महाराष्ट्राची / ठाणे )


 

लेक लाडकी अभियान (महाराष्ट्र राज्य), मुंबई तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व साने गुरुजी यांची जयंती २०२२ निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन २३ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते.

डोंबिवली सांस्कृतिक नगरीचे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे ,ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश एस. ठाकूर, डोंबिवली यांना “भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२” मा. महापौर मुंबई महानगरपालिका स्नेहल आंबेकर, ॲड. आशाताई लांडगे मा. सदस्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग डॉ. सारिका पाटील अधिष्ठाता डीन नायर हॉस्पिटल, स्नेहल भोपळे मिसेस स्टाईल आयकॉन इंडीया वेजेती २०२१ मॉडेल /अभिनेत्री व इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्यांनी केलेल्या साहित्य क्षेत्रातील विशेष व उल्लेखनीय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार्थी सुप्रसिद्ध कवी अविनाश ठाकूर यांच्या वर सर्व साहित्य स्तरातून कौतुक वर्षाव होत आहे.

Related Posts

Leave a Comment