जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये साक्षी शिगवण हिचे सुयश
( दिशा महाराष्ट्राची )
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाने तालुका क्रीडा संकूल, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते, ता. चिपळूण येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात साक्षी शिगवण हिने लांब उडीमध्ये जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक संपादन केला. तसेच सातारा येथे संपन्न होणा-या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल तिचे मंडणगड परिसरातून अभिनंदन होत आहे. क्रीडाशिक्षक प्रा. अशोक कंठाळे, प्रा. प्रमोद वासकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
हे यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह सतीश शेठ, संस्था पदाधिकरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.