मालसई गावची सुकन्या अवंतिका ठरली आयकाँन आँफ महाराष्ट्र
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई मंगेश जाधव)
रोहा तालुक्यातील मालसई गावची सुकन्या असलेली अवंतिका अनिल मोहीते ही माँडेलिंग स्पर्धेत सर्वोत्कुष्ठ कामगिरी करुन विजयी ठरली आहे. आयकाँन आँफ महाराष्ट्र यांच्या वतीने सदरची माँडेलिंग स्पर्धा मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध शहर आणि विभागातुन मोठ्या प्रमाणावर स्पर्धेक सहभागी झाले होते. तर ग्रामीण भागातुन या मोठ्या स्पर्धेत अवंतिकाने सहभाग नोंदवून या स्पर्धेत विजयाची मोहर उमटविल्याने तिच्या या सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
सध्या ती एम. बी. मोरे महाविद्यालय धाटाव येथे आपले विद्यालयीन शिक्षण घेत आहे. माँडेलिंग या क्षेत्राबदल अवंतिकाला लहानपणापासुन विशेष अशी आवड असुन त्याच क्षेत्रात आपले करियर करण्याचा तिचा मानस असल्याने तिने या बाबत माहीती देताना सांगितले. तिच्या या यशाबद्दल मालसई ग्रामस्थ महीला मंडळ, तरुण मंडळ यासह संपूर्ण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.