Home सामाजिक सुप्रसिद्ध कवी दिलराज पवार यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

सुप्रसिद्ध कवी दिलराज पवार यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

Spread the love

सुप्रसिद्ध कवी दिलराज पवार यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन


 

(दिशा महाराष्ट्राची / मुंबई प्रतिनिधी)

तेजोमय प्रकाशित झाला तिमीरात कोहिनूर भारताचा, बुध्दाची ती बुध्द प्रणाली निनादे शांती समतेची, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला, भीमाकोरेगांव केले भीमाकोरेगांव, यावे मरण मज रम्य सकाळी गाता गाता माझ्या भीमाची भूपाळी, भीमानं केलंय धर्मांतर, धम्म सोहळा सजलाय नागांच्या नागपूरात, येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ, धाडा निरोप माझ्या लाडक्या भािवाला, लोकशाहीर धुरंदर महायोगी युगंधर, इथे एक भीमाचा पक्ष पाहिजे, अन्याय अत्याचार साहू कसा गम झोप येते रमा पण मी झोपू कसा गम.. अशा एकापेक्षा एक लोकप्रिय गीतांनी आंबेडकरी समाजाच्या मनात अधिराज्य गाजवणारे अन् शिंदेशाही घराण्याच्या तिसऱ्या पिढीलाही गीते पुरविणारे प्रख्यात कवी, गायक दिलराज पवार हे सध्या मेंदूच्या गंभीर आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात येणार असून, त्यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक असूनही, शस्त्रक्रियेसाठी लागणारा एवढा खर्च ते उभा करु शकत नाही.

           आर्थिक मदत करण्यासाठी
दिलराज पवार यांचा फोन पे व गुगल पे नंबर             7506313838

तरी कृपया समाजातील मान्यवर दानशूर व्यक्तींनी दिलराज पवार यांना सढळ हस्ते आर्थिक मदत करणेकामी सर्वतोपरी योग्य ते मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन कवी दिलराज पवार मदत निधीच्या माध्यमातून सिध्दार्थ साळवी, अमनकुमार आढाव, मिलिंद कांबळे चिंचवलकर, प्रेम धांदे, संगम कासारे, अशोक निकाळजे, संतोष गमरे, संदीप यादव, निलेश पवार, मंगेश जाधव यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Comment