संसदेच्या नव्या इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे – खासदार ओवैसी
केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. पण, आता या इमारतीच्या खर्चात 282 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर इमारतीचं काम वेगानं सुरू असून दोन महिन्यांपूर्वीच येथील अशोक स्तंभांचं अनावरण करण्यात आलं.
नव्या संसदेच्या इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी AIMIM पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतीच केली आहे.
संसद सभागृह हे संविधानानुसार चालते. त्यामुळे नव्या संसद भवनाचं नाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरूनच असावे असे ओवैसी म्हणाले.