Home क्रीडा रोहित- द्रविड जोडी अपयशी ठरतेय का?

रोहित- द्रविड जोडी अपयशी ठरतेय का?

Spread the love

रोहित- द्रविड जोडी अपयशी ठरतेय का?


( दिशा महाराष्ट्राची ) 


 

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये जेव्हा भारतीय क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरला तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला होता. वर्ल्डकपनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला आणि विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.

संघातील हया बदलानंतर राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या जोडीकडे सूत्रे देण्यात आली. त्यानंतर सुरू झाली टी-२० वर्ल्डकप २०२२ची तयारी. आतापर्यंत जी तयारी झाली आहे त्यावर आता अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. कारण वर्ल्डकप एका महिन्यावर आला आहे. वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा देखील झाली आहे.

जेव्हा राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी जबाबदारी घेतली तेव्हा हा संदेश स्पष्ट देण्यात आला की आता भारतीय क्रिकेट संघ टी-२० क्रिकेट खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल. आक्रमक रणनितीवर जोर देण्यात आला. प्रत्येक खेळाडूची भूमिका निश्चित करण्यात आली आणि खेळाडूंना अधिक आक्रमक खेळण्यास सांगितले गेले. निकाल काहीही लागला तरी चालेल पण आक्रमकपणा ठेवण्यास सांगितले. या सोबत अनेक प्रयोग करण्यात आले, त्यापैकी काही यशस्वी ठरले तर अपयशी झाले. मात्र आता टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झाली तेव्हा आतापर्यंत झालेल्या प्रयोगाची कोणतीही झलक दिसली नाही.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा जोडीने सर्वाधिक प्रयोग सलामीवीरांबाबत केले. गेल्या एका वर्षात भारतीय संघाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये इतके प्रयोग केले ज्याची मोजदात केली तर हातांची बोट कमी पडतील. ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा, ऋषभ पंत सारखे खेळाडू टी-२० मध्ये सलामीवीर म्हणून आले आहेत.

हे प्रयोग यासाठी झाले की टी-२० टीम अधिक आक्रमक होईल. पण त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही. कारण वर्ल्डकपमध्ये संघातील टॉप-३ रोहित-राहुल-कोहली कोणताही बदल झालेला दिसत नाही. विराट कोहली वर्ल्डकपमध्ये सलामीला येणार का हे अद्याप ठरले नाही. गेल्या वर्ल्डकप प्रमाणे राहुल-रोहितच पुन्हा सलामीला येण्याची शक्यता अधिक आहे.

Related Posts

Leave a Comment