भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित बहिणाबाई चौधरी कविसंमेलन उत्साहात साजरे
( दिशा महाराष्ट्राची )
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, कवी संमेलनने, सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्थने महाराष्ट्रभर आपला विस्तार केला. नुकताच या संस्थेच्या सोलापूर शाखेचे बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कवी संमेलन पंढरपूर येथे ११ सप्टेंबर रोजी पार पडले.
विविध उपक्रमांचे आयोजन करत तळागाळातील कवी लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी संस्था हीच या संस्थेची खरी ओळख. हीच आपली ओळख जपत भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून बाळासाहेब देशमुख उपस्थित होते. त्याचबरोबर व्यवहारे, रामदास शेटे, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच चे अध्यक्ष विशाल सिरसट, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच चे संस्थापक उपाध्यक्ष विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्षा डॉ. प्राची बामणे यांची विशेष उपस्थिती या कवी संमेलनाला लाभली.
नवोदित कवी, लेखकांकरीता हक्काने काम करणा-या मोजक्याच संस्था आहेत. पण विशेषतः तळागाळातील, दुर्लक्षित नवोदितांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देत आहे असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले व जेव्हा जेव्हा आपणांस मदतीची गरज भासेल तेव्हा आमचे सहकार्य नक्कीच लाभेल असेही आश्वासन दिले.
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित या कवी संमेलनासाठी राज्यभरातून कवींनी उपस्थिती दर्शवली, उपस्थितीत कवींनी आपल्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. डॉ. प्राची बामणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या पश्चिम महाराष्ट्रा प्रदेश कार्याध्यक्ष सुमंत पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय सांगोलकर, प्रा. खांडेकर, लातूर जिल्हा अध्यक्ष योगेश हरणे, शुभम मोहिते, या पदाधिकारी यांनी मेहनत घेत हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न केला त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.