ब्रह्मास्त्राची बॉक्स ऑफिस वर पाचव्या दिवशी ही घसरण
९ सप्टेंबर रोजी अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि नागार्जुन स्टारर चित्रपट ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाला. चित्रपटाने वीकेंडमध्ये बंपर कमाई केली असली तरी सोमवारीच्या कमाईत घट झाली आणि मंगळवारी चित्रपटाने आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केले आहे. ब्रह्मास्त्रचे (Brahmastra Movie) पहिले तीन दिवस चांगले कलेक्शन झाले होते, तर सोमवारपासून चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. तरीही यानंतरही चित्रपटाची कमाई चांगली होत आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे हिंदी कलेक्शन आतापर्यंत १३०.५० कोटी रुपये आहे, तर चित्रपटाच्या साऊथ व्हर्जनने १७.२५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने भारतात जवळपास १४७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे