वाचनवेल प्रतिष्ठान आयोजित शिवव्याख्याते प्रा. विशाल गरड यांच्याशी दिलखुलास गप्पा
दीपेश मोहिते / ठाणे प्रतिनिधी
दिनांक 11. 09. 2022 रोजी आयोजित हा कार्यक्रम प्रचंड प्रतिसादात चालू झाला. ऑनलाईन असलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवारांनी उपस्थिती दाखविली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संवादक विश्वजित शिंत्रे यांनी लेखक विशाल गरड यांचे आणि संस्थापिका रुपाली सोनावणे यांचे स्वागत करून, प्रा. विशाल गरड यांची थोडक्यात ओळख करून दिली आणि त्यानंतर रायरी या कादंबरीचा प्रवास उलगडवणारी मुलाखत सुरु झाली.
विश्वजित शिंत्रे यांनी अगदी सहज संवाद साधत अनेक प्रश्न लेखकांना विचारले आणि अर्थात लेखक विशाल गरड यांनी अगदी त्या सगळ्या प्रश्नांना दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिली. शिवाजी महाराज, त्यांचे विचार, शिवभक्त, त्याविषयी असलेले समज, गैरसमज, आता चालू असलेली समाजातील ढासळती परिस्थिती अशा अनेक विषयांवर सर्वांगीण चर्चा,गप्पा झाल्या.
त्यानंतर पुढील भागात श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ देण्यात आली. उपस्थित श्रोत्यांनी ही अनेक मनातले प्रश्न लेखकांना विचारले, लेखकाने ही त्यांना समर्पक उत्तरे देऊन श्रोत्यांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या शेवटी वेळेच्या मर्यादा पाहून समारोप करण्यात आला.
वाचनवेल संस्थापिका रुपाली सोनवणे यांनी लेखक विशाल गरड, संवादक विश्वजित शिंत्रे, तांत्रिक साहाय्य करणारे शैलेश उभे तसेच सर्व उपस्थित श्रोत्यांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. लवकरच या कार्यक्रमाच्या पुढील भागात नवीन लेखक आणि पुस्तकावर गप्पा मारण्यासाठी भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेण्यात आला.