आयुष्य जगताना – कविता
दैनंदिन जीवनात
रोजची कामे केली
अचानक दुर्लक्षित
कविता मला भेटलीतुझी माझी प्रेमाची
परिभाषा समजली
भावनेला जोडलेली
कविता मला भेटलीमातृत्व लाभले अन
माझी माय उमगली
आईपण जगताना
कविता मला भेटलीआयुष्यात जगताना
साहित्यरचना झाली
मन मोकळे कराया
कविता मला भेटलीशब्दांत गुंफत भाव
काव्यात गुंतत गेली
मैत्रीण अशी छान
कविता मला भेटलीकवयित्री – डॉ. प्राची जगताप बामणे
डोंबिवली जिल्हा ठाणे
![]()