खेड तालुक्यात कोकण भुमिपुत्र / कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे घरगुती गौरी- गणपती सजावट स्पर्धा संपन्न
आपल्या माणसांच्या कलागुणांना दाद नवंप्रेरणा मिळावी ह्यासाठी २०१८ पासून कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली सामाजिक संस्था कोकण भुमिपुत्र / कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील तुंबाड गावात घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नियोजित स्पर्धेत समस्त तुंबाड ग्रामस्थांनी हिरारीने सहभागी होऊन स्पर्धा नियोजनबद्द व यशस्वी पार पडल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. स्पर्धमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय ह्या तीन क्रमांकाना- सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ, पुष्क व छत्रपती शिवाजी महाराजांची सिहासन विराजमान मूर्ती व तीन उत्तेजनार्थ क्रमांकाना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ, पुष्क व सहभागी सर्व स्पर्धकाना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी तुंबाड गावचे विद्यमान सरपंच श्री. बेंडू कदम साहेब, पोलिस पाटिल श्री. हरिश्चंद्र कदम साहेब, तुंबाड गावचे ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष- सदस्य, वाडी प्रमुख, महिला भगिनी, युवक वर्ग, प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. तुषार खांबे, अध्यक्ष- श्री. विजय शिंदे, कोषाध्यक्ष- कु. पांडुरंग जाधव, कु. वृषाली गोरीवले, संघटक- प्रथम हूंबरे, कु.अंकेश नाचरे, कु. तेजस खांबे, सौ. विधीशा शिंदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक-सल्लागार श्री. सचिनजी रेमजे साहेब, श्री. विजयजी शिंदे साहेब, श्री. नारायणजी रेवाळे साहेब, श्री. मनोहरजी नाचरे साहेब ह्यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष- कु. ऋषिकेश लाड व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शिंदे यांनी केले.